(मोताळा लाईव्ह ) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी भव्यशक्ती प्रदर्शन करत मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघासाठी तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज भरला आहे. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी आज भव्यशक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांच्यासोबत रावेर विधानसभेचे विद्यमान आमदार शिरीष चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रवींद्र भैय्या पाटील हे उपस्थित होते.