(मोताळा लाईव्ह) भडगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार किशोर पाटील यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन रॅलीमध्ये सहभागी झाले होते. यावेळी महायुतीच्या जास्तीत जास्त जागा या निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्यात होत असलेल्या बंडखोरी बाबत त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की संबंधितांशी माझे देखील बोलणे झाले आहे. देवेंद्र फडणवीस देखील त्यांच्याशी बोलणार आहेत लवकरच जिल्ह्यात कुठेही बंडखोरी दिसून येणार नसल्याचे त्यांनी सांगितले असे झाल्यास त्वरित कारवाई केली जाईल. आज गर्दी बघता पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार आमदार किशोर पाटील यांचा विजय हा निश्चित असल्याचे यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले आहे.