बुलडाणा: जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त सैनिकी मुलांचे वसतिगृह, चिखली रोड येथे कार्यरत असून त्यामध्ये माजी सैनिकांच्या उपचाराकरिता इसीएचएस कार्यान्वित आहे. इसीएचएसमध्ये दररोज 100 ते 150 माजी सैनिक विधवा तसेच त्यांचे अवलंबित उपचार व योजनेचा लाभ घेण्यासाठी येतात. या सैनिकी मुलांच्या वसगिृहाजवळ 1 कि.मी. अंतराच्या आत अल्पोहाराकरीता कोणतेही उपहागृह उपलब्ध नसल्याने वसतिगृहातील भोजनकक्ष भाडेतत्वावर देण्यासाठी जिल्ह्यातील इच्छुक माजी सैनिक, माजी सैनिक महिला बचत गट, माजी सैनिक विधवा व इतर नागरीक यांचेकडून अर्ज मागविण्यात येत आहे. भोजनकक्ष भाडेत्वावर देण्यासाठी माजी सैनिक महिला बचत गट, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, इतर नागरीक याप्रमाणे प्राधान्य दिल्या जाईल. तरी इच्छूक अर्जदारांनी आपले अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय बुलडाणा येथे दि. 25 ऑक्टोंबर 2024 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे