घुस्सर येथे ब्लु पँथर ग्रुप च्यावतीने जयश्री शेळके याचा सत्कार

113

(मोताळा लाईव्ह ) ६८ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने घुस्सर खुर्द तालुका . मोताळा येथे निळकंठभाऊ वानखेडे संस्थापक अध्यक्ष ब्लु पँथर ग्रुप यांच्यावतीने भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात सत्यशोधक, महापरिनिर्वाण चित्रपटाचे निर्माते सुनील शेळके यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. ते उपस्थित राहू न शकल्याने त्यांच्यावतीने बुलडाणा विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्रीताई शेळके यांनी सत्कार स्विकारला. या मेळाव्यास सुनिलभाऊ घाटे जिल्हा उपप्रमुख, शिवसेना, गजानन मामलकर, तालुका अध्यक्ष काँग्रेस, शिवसेना ( उबाठा) तालुका संघटक राजुभाऊ बोरसे, ब्लु पँथर ग्रूपचे सन्माननीय पदाधिकारी शेषरावभाऊ गायकवाड, भीमरावभाऊ खराटे, विनोदभाऊ धुरंदर, विनोदभाऊ सावळे, कुंडलिकभाऊ उमाळे, सुपडाभाऊ गरुडे, मधुकरभाऊ शिरसाट, राजेंद्रभाऊ सावळे, चंद्रकांतभाऊ खराटे, मिलिंदभाऊ बोदडे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते गौतमभाऊ सरकटे, यांच्यासह पंचक्रोशीतील गावकरी उपस्थित होते !