एकल महिलांच्या स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळासाठी पाठपुरावा करणार – जयश्री शेळके

45

(मोताळा लाईव्ह ) बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्यास एकल महिलांच्या स्वतंत्र महामंडळासाठी पाठपुरावा करणार असल्याच आश्वासन ऍड. जयश्री शेळके यांनी दिलं आहे, राज्यात विधवा, परितक्ता, घटस्फोटीत महिलांच्या अनेक समस्या आहेत, त्यांच्या न्याय हक्कासाठी गेल्या दोन वर्षापासून प्राध्यापक दत्तात्रय लहाने यांनी बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरात लोक चळवळ उभी केली आहे, आणि त्या माध्यमातून एकल महिलांसंदर्भात धोरण निश्चित करण्याची मागणी केली जात आहे, या मागणीला समर्थन देत आपण विजयी झाल्यास सभागृहामध्ये एकल महिला संदर्भात धोरण निश्चित करून, स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याच आश्वासन ऍड. जयश्री शेळके यांनी दिल आहे…