राज्य उत्पादन विभागाची कारवाई; आचारसंहितेच्या कालावधीत 68 लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त: 223 आरोपींना अटक तर 37 वाहने जप्त

17

(मोताळा लाईव्ह)विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या कालावधीत अवैध मद्यनिर्मिती, वाहतुक व विक्री मोठ्या प्रमाणात होतात. अशा घटनाना प्रतिबंध घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. मोहिमेंतर्गत आचारसंहिता कालावधीत दि. 17 नोव्हेंबरपर्यंत अवैध मद्यनिर्मिती व विक्री प्रकरणी प्रकरणी 223 आरोपींना अटक करण्यात आले असून 37 वाहने जप्त केली आहेत. या कारवाईत 68 लक्ष 71 हजार 551 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. पराग मो. नवलकर यांनी दिली आहे.

दि 15 ऑक्टोबर ते 17 नोव्हेंबर 2024 अखेर बुलढाणा जिल्ह्यातील हातभट्टी ठिकाण, तसेच अवैध मद्यविक्री केंद्रावर विविध ठिकाणी छापे घालुन 223 आरोपींना अटक केली आहेत. सदर गुन्ह्यात एकुण 37 वाहने जप्त केली असून एकुण रुपये 68 लक्ष 71 हजार 551 रुपयांचा मुद्येमाल जप्त केलेला आहे. सदर कारवाई बुलढाणा जिल्हयातील मौजे बोराखेडी, पाडोळी, मातला, पेसोंडा, चौंडी, बोरी आडगाव, राजूर उमरखेड शिवार, कोलवड इत्यादी ठिकाणी छापे टाकुन केलेली आहे.