सुनिल कोल्हे यांच्यावर हल्ला करणाऱ्या एका आरोपीला बोराखेळी पोलिसांची केले अटक

14

( मोताळा लाईव्ह ) राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे मोताळा तालुकाध्यक्ष सुनिल कोल्हे यांच्यावर 25 नोव्हेंबर रोजी प्राणघातक हल्ला झाला होता. त्याबाबत सुनील कोल्हे हे गंभीर जखमी झाले होते त्यामध्ये सुनील कोल्हे यांच्या हात हे फॅक्चर झाले व पायाला जबर मार लागला होता त्याबाबत सुनील कोल्हे यांनी बोराखेळी पोलीस स्टेशन ला तकार दिली होती त्या प्रकरणी करण शाम काटकर याला बोराखेळी पोलिसांनी ताब्यात घेतेले असून हा आरोपी बुलढाणा शहरातील इंदीरा नगरमधील रहिवासी असून या हल्ल्याच्या मागे ‘मास्टर माईंड’ कोण, याचा शोध घेण्यासाठी पोलिस घेत असून लवकर सर्व आरोपी गजाआड करणार आहे असे बोराखेळी पोलिसांनी सांगितले आहे