( मोताळा लाईव्ह ) आंबेडकरवादी एकता मंच मोताळा तालुक्याच्या वतीने दिनांक 1 जानेवारी 2025 ला मोताळा येथे भीमा कोरेगाव शौर्यतीनिमित्त विजय स्तंभाच्या प्रतिकृती व शहिदांना मानवंदना देण्याच्या कार्यक्रम आयोजित केला आहे….राजकारण पक्ष संघटना गट तट विरहित असा बौद्ध समाज बांधवांच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 1 जानेवारी 1818 रोजी 25000 पेशवे सैनिकाचा केवळ 500 शूरवीर महार सैनिकांनी पराभव केला होता,
विषमतवादी समाज व्यवस्थेने माणसा माणसात मतभेद निर्माण करून, एकमेकांना शत्रू बनवले, तथाकथित अस्पृश्यांना पशु पेक्षाही ही तुच्छ वागणूक दिल्या जात होती, गळ्यात मडके व पाठीमागे खराटा बांधण्यात आला ही अपमान जनक अस्पृश्य सूचक खुणा फेटाळण्यासाठी व समतेची वागणूक मिळावी यासाठी शूरवीर महार सैनिकांनी पेशवे इंग्रज युद्धात इंग्रजांच्या बाजूने लढण्याचा निर्णय महार सैनिकांनी घेतला हा लढा कोण्या जातीविरुद्ध नव्हता तर समतेसाठी विषमतेविरुद्ध होता. अशा शूर पूर्वजांच्या पराक्रमाच्या स्मृतिपर्थ मानवंदनाचा कार्यक्रम मोताळा येथे ठरला आहे सर्वांना आंबेडकरवादी एकता मंच मोताळा यांच्यातर्फे आवाहन करण्यात येत आहे की आपण या कार्यक्रमाला उपस्थित रहावे .