(मोताळा लाईव्ह ) मोताळा फाट्यावरती मोठ्या प्रमाणात वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहने लावल्या जातात त्यामुळे मलकापूर कडून बुलढाणा कडे जाणाऱ्या किंवा बुलढाण्याकडून मलकापूर कडे जाणाऱ्या वाहनांना या ठिकाणी तारेवरची कसरत या ठिकाणी करावी लागते यामध्ये उभे असलेल्या वाहनांना जर धक्का लागला पुन्हा वाद किंवा कोणी जर सहज बोलले “भैया गाडी साईड मे लेलो’ तर “तेरा बाप का रस्ता है ‘ क्या अशा प्रकारचे सुद्धा या ठिकाणी किरकोळ बोलाण्यावरून वाद विगोपाला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही दिनांक २९/१२/२०२४ रोजी १० वाजेच्या सुमारासपुण्याकडून येणार एका ट्रॅव्हल्स व मोटार सायकल किरकोळ हटवण्यावरून वाद झाला आणि त्या ड्रायव्हरला मारहाण सुद्धा करण्यात आली त्यामुळे मोताळा फाट्यावरती मोठ्या प्रमाणात बस स्थानकाच्या समोरच या ठिकाणी वाहने लावल्या जातात त्यामुळे बस स्थानकामध्ये जाणाऱ्या येणाऱ्या एसटी बसला सुद्धा या ठिकाणी हा त्रास सहन करावा लागतो त्यातच जर कोणाला धक्का लागला तर पुन्हा पुन्हा वाद होतात त्यामुळे या वाहनांना कोण शिस्त लावणार यांच्यावरती कारवाई का होत नाही असा प्रश्न निर्माण होतो दिनाक ३०/१२/२०२४ दुपारच्या सुमारास बुलढाणा कडून जळगाव जामोद कडे जाणाऱ्या बस एका महिला धक्का लागला महिलेच्या पायाला दुखापत झाली त्या कारणावरून वाद निर्माण झाला व त्या ड्रायव्हरला सुद्धा या ठिकाणी मारहाण करण्यात आली. त्यामुळे मोताळा फाट्यावरती मोठ्या प्रमाणात आता अस्ताव्यस्त वाहन लावण्याची जणू काहीही फॅशनच झाली असून जो वाटेल तिथे गाडी लावून देतो त्यातच रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात भाजीपाला हातगाड्या सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात त्यामुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अडथळे त्यातच या ठिकाणी बाराखडी पोलीस स्टेशनचा एक पोलीस कर्मचारी सुद्धा या फाट्यावरती पाहायला मिळत नाही त्यामुळे या वरती कोणाचा वचक नाही फाट्यावर वाहन चालवताना या ठिकाणी मोठी कसरत करावी लागते त्यामुळे आता या वाहनधारकांना कोण शिस्त लावणार हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे जर हे असेच राहिले तर एखाद्या दिवशी असाच एखादा मोठा अपघात होऊन वाद विकोपाला जाऊ शकतो त्यामुळे खबरदारी घेणे हे गरजेचे असून या ठिकाणी बेसिस्त वाहनांना या ठिकाणी धडा शिकवणे गरजेचे आहे त्यातच मोताळा बस स्टँडचे सध्या बांधकाम चालू असल्याने बस स्थानकाचे एकच गेट त्या बसमधून बस जाण्याने करत असतात मात्र त्या बस स्थानकाच गेट वरती या ठिकाणी ऑटो,काली पिली ,सुद्धा या ठिकाणी लावल्या जातात त्यामुळे बस ड्रायव्हर नेमकं गाडी कुठून बस स्थानकात नेऊ असा प्रश्न पडतो त्यामुळे आता बोराखडी पोलीस स्टेशन ने यावरती ॲक्शन घेणे गरजेचे असलेली सुद्धा नागरिकांची मागणी होत आहे