राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल; पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

16

(मोताळा लाईव्ह ): सिंदखेड राजा येथे 12 जानेवारी रोजी श्री. राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा मोठया प्रमाणावर साजरा होतो. त्याअनुषंगाने या ठिकाणी कायदा व सुववस्थेच्या प्रश्न निर्माण होऊ नये याकरीता राष्ट्रीय महामार्ग क्र.753(C) पुणे-नागपूर वरील व राज्य महामार्ग क्र.51 सिंदखेडराजा-देऊळगाव राजावरील जड वाहतुक दि. 11 जानेवारीचे रात्री 1 वाजेपासून ते दि. 12 जानेवारीचे रात्री 12 वाजेपावेतो पर्यायी मार्गाने वळविण्याबाबत आदेश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी निर्गमित केले आहे.

सध्याचा प्रचलित मार्ग जालना-सिंदखेडराजा-मेहकर ऐवजी पर्यायी मार्ग जालना-देऊळगाव राजा-चिखली-मेहकरचा वापर करावा. तर मेहकर-सिंदखेडराजा-जालना ऐवजी पर्यायी मार्ग मेहकर-चिखली दे.राजा-जालना या मार्गाचा वापर करावा. तसेच देऊळगाव राजा ते सिंदखेड राजा- सिंदखेड राजा ते देऊळगांव राजा या मार्गावरील जड वाहतुक बंद ठेवण्यात आले आहे.
सदर आदेशाचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास मुंबई पोलीस वाह