(मोताळा लाईव्ह ) पिंपळगांव देवी हे जगदंबा मातेच पवित्र स्थान असुन येथे दी. १३ जानेवारी पौष पौर्णिमेला परंपरागत भव्य यात्रा भरते अनेक राज्यातुन लाखोच्या संख्येत श्रधाळु येथे पावलेल्या नवसाला व दर्शनार्थ येतात येणाऱ्या भाविकांसाठी जळगाव जिल्ह्यासह बुलढाणा व लांब लांबुन व्यवसायीक आपले दुकाने थाटतात अश्याच प्रकारे जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथिल अनिल छगन भोई वय ५० वर्ष याने धा.बढे पोलीसात दीलेल्या तोंडी रिपोर्ट वरुन मृतक गणपत जगन भोई वय ४५ वर्ष रा.रावेर ता. रावेर हा दी.१३जानेवारी रोजी पिं.देवी यात्रेतील दाळ्या पोहा व रेवडी विक्रीच्या दुकानात काम करण्यासाठी आला व दुसरे दीवशी दी.१४ जानेवारी रोजी दुपारी १,३० वाजे दरम्यान कुणालाही न सांगता दुकानातुन निघुन गेला खबर देणार अनिल छगन भोई यास असे वाटले की याला दारु पिण्याची आदत असल्याने गेला असावा परंतु दुपारी दीड वाजे पासुन ते रात्री आठ वाजे पर्यंत न आल्याने त्याचा रात्री १२ वाजे पर्यंत यात्रेत शोधाशोध केली परंतु तो मिळुन आला नाही त्याचे नातेवाईक यांना फोन करुन विचारले असता कुठेच त्याचा शोध लागला नाही दी.१५ जानेवारी रोजी १२,३० वाजे दरम्यान लोकांचे चर्चेतुन समजले की पिंपळगाव देवी शिवारातील पिं.देवी ते लोणवाडी रस्त्यावरील पुलाचे खाली एक ईसम मरण पावलेल्या अवस्थेत दीसुन आला अश्या लोकचर्चेतील माहीतीच्या शंकेवरुन जावुन पाहीले असता खबर देणारा अनिल भोई त्याचा मावस भाउ मृतक गणपत जगण भोई हा मृत अवस्थेत दीसुन आला मृतक गणपत भोई यास दारु पिण्याची सवय व सवयीचा असल्याने तो दारु पिऊन पुलावरुन पाय घसरुन पडल्याने त्याचा मृत्यू झाला असावा त्याचे मृत्यू बाबत खबर देणार याचा कोणत्याही प्रकारचा संशय नाही खबर देणार अनिल छगन भोई याचे तोंडी रिपोर्ट वरुन धा.बढे पो.स्टे चे दाखल अधिकारी पोहेकाॕ संजय जवरे यांनी मर्ग क्रं. 02/2025 कलम 194 BNSS प्रमाणे नोंद केली असुन पुढील तपास ठाणेदार यांचे आदेशाने पोहेकाॕ राजेंद्र राणे करीत आहे