(मोताळा लाईव्ह ) मोताळा तालुक्यातील बोराखेडी पोलीस स्टेशन अंतर्गत मोठ्या प्रमाणात गेल्या काही वर्षांपासून सतत चोऱ्या होत आहे. दोन दिवसा अगोदरच मोताळा तालुक्यातील दाभाडी येथे दरोडा त्यानंतर आता मोताळा तालुक्यातील असलेल्या पिंपळपाटी येथे दोन ते अडीच लाखाची दिवसाढवळ्या चोरी झाली आहे त्यामुळे आता दिवसाढवळ्या सध्या चोऱ्या होत असून. विशेषता म्हणजे या चोऱ्या आता गावाखेड्यात व्हायला लागलया आहे. आता जणू चोराना आपला मोर्चा गावाकडे वळवला काय असे सुद्धा पाहायला मिळते. मोताळा तालुक्यातील असलेल्या पिंपळपाटी या गावांमध्ये राहणारे संजय नारायण घाटे हे आपल्या कुटुंबासह राहतात संजय घाटे कामानिमित्त सकाळीच बाहेर गेले होते.त्यांच्या पत्नीने घरातील कामे अटपून दहा साडे दहाच्या सुमारास शेताकडे निघून गेल्या. या संधीचा फायदा घेत चोरट्याने दुपारी बारा ते एक वाजेच्या सुमारास घरामध्ये प्रवेश करून घरातील असलेल्या लाकडी कपाटातील लॉकर तोडून त्यामध्ये असलेले एक गहू पोत व कारले मण्याची पोत व नगदी दहा हजार रुपये घेऊन चोरटा पसार झाला असून याबाबत संजय नारायण घाटे यांनी बोराखेळी पोलीस स्टेशन गाठले असून याबाबत चोरीची माहिती दिली आहे.