देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती उत्सवाला प्रारंभ.

28

(मोताळा लाईव्ह ) देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या त्याग आणि समर्पणामुळेच क्रांतीचे स्फुल्लिंग प्रज्वलित झाले. नेताजींच्या आजाद हिंद फौजमुळेच हिंदुस्थानात स्वातंत्र्याची पहाट उगवली. नेताजींच्या आजाद हिंद सरकारचे राष्ट्रगान आणि सुभाष बाबूंचा जय हिंद चा नारा देशाने सन्मानाने स्वीकारला. नेताजींचे विचार आजही देशाला तारू शकतात.त्यासाठी नेताजींच्या विचारावर कार्य करणाऱ्या निस्वार्थ चळवळींचे योगदान मोठे आहे. नेताजींच्या विचारांना वृद्धिंगत करणाऱ्या आजाद हिंद च्या 31 व्या नेताजी जयंती पराक्रम दिवसाला उपस्थित राहण्याचे सौभाग्य लाभले. असे मत सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष पत्रकार राजेंद्र काळे यांनी व्यक्त केले.
देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 128 व्या जयंती निमित्त देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने 23 ते 30 जानेवारी दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने आज जिल्हाभरात सुभाषबाबूंना मानवंदना देत अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
तर बुलढाणा शहरात प्रमुख मार्गाने शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेदरम्यान शहरातील मुख्य बस स्टॅन्ड मधील नेताजींची प्रतिमा, नेताजी चौक फलक, छत्रपती शिवरायांना मानवंदना देत भारतीय स्वतंत्रता स्मारकावर मुख्य अभिवादन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी अभिवादन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राजेंद्र काळेंनी उपरोक्त मत व्यक्त केले.