नेहरू युवा केंद्रामार्फत राष्ट्रीय युवा स्वयंसेवी भरती; ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

13

(मोताळा लाईव्ह ) भारत सरकारच्या राष्ट्रीय युवा कोर योजनेअंतर्गत नेहरू युवा केंद्र बुलढाणामार्फत डिजिटल कृषी मिशन राबविण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यातील तरुण-तरुणींना स्वयंसेवी गटांमध्ये संघटित करूण त्यांची ऊर्जा आणि क्षमता राष्ट्र उभारणीच्या कार्यात वापरण्यासाठी राष्ट्रीय युवा स्वयंसेवी भरती करण्यात येणार आहे. यासाठी उमेदवार हा पदवीधारक असावा, वयोमर्यादा 18 ते 29 वर्षाच्या आतील युवा युवती, ज्या तालुक्यासाठी अर्ज करणार आहे त्या तालुक्याचा रहीवाशी असावा. नियुक्त उमेदवारांना प्रती महा पाच हजार रुपये मानधन देण्यात येईल. इच्छूक तरूण, तरुणीनी योजनेबद्दल सविस्तर माहिती व ऑनलाईन अर्जाकरीता   https://nyks.nic.in/nycapp/main.asp या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन अर्ज दि. 8 फेब्रुवारीपर्यंत सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.