[मोताळा लाईव्ह ] येथून जवळच असलेल्या पोफळी येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षीसुद्धा श्री संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन साजरा करण्यात आला.सुरुवातीला सकाळी 9 वाजता बस स्थानक येथील मंदिरापासून गण गण गणात बोते च्या जय घोषात टाळ मृदूंगाचे निनादात दिंडी ला सुरुवात करण्यात आली. यावेळी महिलांनी आप आपल्या घरासमोर सडा सारवन करुन रांगोळ्या काढल्या होत्या. सदर दिंडी मधे महिलांनी फुगड्या खेळून सहभाग नोंदवला. दिंडी मंदिरात आल्यानंतर 11 वाजता सामूहिक आरतीला सुरुवात झाली. त्यानंतर पंचक्रोशीतील अनेक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला
दरम्यान पोफळी, धोनखेड व परिसरातील भजन मंडळींनी श्रीं ची अनेक भजन म्हणत सर्व भाविक भक्तांना मंत्रमुग्ध केली. सदर कार्यक्रम योग्य रित्या पारपाडण्यासाठी पोफळी तसेच आजबाजूच्या सेवेकऱ्यांनी यावेळी सहभाग नोंदवला.