(मोताळा लाईव्ह) मोताळा तालुक्यात काँग्रेसला खिंडार दोन माजी काँग्रेसच्या माजी सभापती पती तथा महिला तालुका अध्यक्ष व इतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे जाहीर प्रवेश
मोताळा तालुक्यातील माजी पंचायत समितीचे सभापती पती अरविंद पाटील तसेच काँग्रेसचे माजी सभापती पती सुरेश सरोदे व महिला काँग्रेस तालुका अध्यक्ष नीताताई पाटील व इतर काँग्रेसच्या पदाधिकारी यांचा आज बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला आहे गेल्या काही दिवसापासून बुलढाणा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला घरघर लागली असून अनेक काँग्रेसच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्याचा मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे प्रवेश होत असून एकीकडे आता याच विधानसभा मतदारसंघाचे असलेले माजी आमदार सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आहेत याच हर्षवर्धन सपकाळ यांच्या मतदारसंघात आता काँग्रेसला घरघर लागली असून सध्या या मतदारसंघांमध्ये काँग्रेस काँग्रेस मधून शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे