[ मोताळा लाईव्ह ] बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुका अंतर्गतचे ग्राम जुमडा येथील रहिवासी व मुंबईत जीआरपी मध्ये कार्यरत असलेले विकी बाबासाहेब मुख्यदल यांचे आज 9 जून रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास मुंबई येथे लोकल ट्रेन ने प्रवास करत असताना मुंब्रा ते दिवा दरम्यान लोकल ट्रेन मधून पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.त्यांच्या मृत्यूची वार्ता गावात समजतात सर्वत्र शोककळा पसरली आहे.
विकी मुख्यदल यांचा जन्म 5 जून 1992 रोजी झाला. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना मुंबई ठाणे जीआरपी विभागात नोकरी मिळाली. 5 वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. त्यांना एक मुलगा आहे.आज सोमवारी सकाळी ते कर्तव्यावर लोकल ट्रेनने जात असताना मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ समोरून आलेली लोकल ट्रेनच्या दरवाज्यावर लटकलेल्या
प्रवाशांचा एकमेकांना इस स्पर्श झाल्याने दोन्ही गाडीच्या दरवाजामध्ये उभे असलेले काही प्रवासी अचानक चालत्या ट्रेन मधून खाली पडले. यामध्ये 6 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.यामध्ये जीआरपी जवान विकी मुख्यदल यांचा देखील समावेश आहे. अपघाताची माहिती गावात समजताच एकच खळबळ उडाली.विकी मुख्यदल यांच्या कुटुंबात त्यांच्या पश्चात आई-वडील,पत्नी,2 भाऊ, एक मुलगा असा आप्त परिवार आहे. जीआरपी जवान विकी मुख्यादल यांच्या अचानक जाण्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.