[मोताळा लाईव्ह] मोताळा शहरातील असलेल्या आदर्श नगरातील मंगेश रामभाऊ पारस्कर वय 25 वर्ष हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कॉम्प्रेसर मशिन चे साह्याने घरगुती /कमर्शियल गॅस सिलेंडर मधील गॅस ऑटो रिक्षा मधील टाकीमध्ये भरताना पोलिसांना समक्ष मिळून आला. त्यावेळी त्याच्या ताब्यातून गॅस सिलेंडर , 2ऑटो रिक्षा, मारुती इको कॉम्प्रेसर मशीन व इतर मुद्देमाल मिळून आला असून त्यावेळी इं गॅस सिलेंडर, मारोती ECO 2 ऑटो रिक्षा,कॉम्प्रेसर मशीन एकूण किं 3,72000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून कलम 287 BNS अन्न सुरक्षा मानके अधिनियम कलम 3,7 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले असून
सादर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे साहेब, अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा व खामगाव, उपविपोअ बुलढाणा यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक श्री. सुनील अंबुलकर सर यांचे आदेशाने करण्यात आली असून या पथकांमध्ये पोलीस उपनिरीक्षक यशोदा कणसे पोलीस HC राजेंद्र अंभोरेHC जगदेव टेकाळे HC दिगंबर कपाटे HC विजय पैठने चालक HC विकास देशमुख इत्यादीने कारवाई पार पडली आहे