निपाणा येथे हर घर तिरंगा जनजागृतीपर तिरंगा रॅली

78

[ मोताळा लाईव्ह ] दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी ग्रामपंचायत कार्यालय निपाणा यांच्या वतीने हर घर तिरंगा मोहिमेकरिता जनजागृतीपर तिरंगा रॅली काढली. माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी उद्देशीत केल्याप्रमाणे यावर्षी सुद्धा हर घर तिरंगा 15 ऑगस्टपर्यंत संपूर्ण देशामध्ये राबविल्या जाणार आहे या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत निपाणा येथील सरपंच सौ शारदा संतोष तांदूळकर यांनी तिरंगा रॅलीचे आयोजन केले होते. रॅलीमध्ये श्री राजकिरण करे कृषी सहाय्यक, श्री अमेय जोशी आरोग्य सेवक, मुख्याध्यापिका सौ घुले मॅडम, ग्रामपंचायत अधिकारी श्री सुरडकर साहेब, सौ ज्योती थाटे सीआरपी, जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेचे विद्यार्थी, जीवन विकास विद्यालय दुधलगाव येथील विद्यार्थी, गावातील शेतकरी बांधव, महिला बचत गट सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस गावांमधून रॅली काढून गावातील शहीद वीरांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले त्यानंतर जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेमध्ये उभारण्यात आलेल्या, शीला फलकाचे पूजन करण्यात आले, शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.