शेतकऱ्यांच्या बांधावर जावुन केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी केली अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेत जमिनीची पाहणी

27

Motala live ..अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बाधित क्षेत्राची नोंद पंचनामांमध्ये करून घ्या ..पंचनामाचे चावडी वाचन करून घ्या .. असे आवाहन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले .नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे असा विश्वासही त्यांन शेतकऱ्यांना दिला

18 आणि 19ऑगस्ट रोजी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला या अतिवृष्टीमुळे शेतात पाणी तुंबुन शेतकऱ्यांच्या शेत जमिनी खरडून गेल्या आहेत यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आज 23 ऑगस्ट रोजी केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला नुकसानग्रस्त शेताच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे या आपत्तीला शेतकऱ्यांनी हिमतीने सामोरे गेले पाहिजे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासंदर्भात अधिकारी कर्मचाऱ्यांना निर्देशित केले आहे परंतु शेतकऱ्यांनी सुद्धा नुकसानीचे पंचनामे योग्य पद्धतीने नुकसानीची नोंद तपासून पहा. झालेल्या पंचनामांची चावडी वाचन करून घ्यावे जेणेकरून कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी सरकारच्या मदतीपासून वंचित राहणार नाही असे आवाहन केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधतांना केले अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून संबंधित विभागाला तात्काळ मदत देण्याच्या सुचना केल्यात आज केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी चिखली शहरातील माळीपुरा भागात नागरिकांच्या घरात पाणी असले होते झालेल्या नुकसानीची पाहणी केली त्यानंतर तालुक्यातील सोमठाणा उत्रादा , पेठ ,बोरगाव काकडे , पांढरदेव , भरोसा भोरसी या गावातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी बांधावर जाऊन केली यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मायाताई म्हस्के तालुकाप्रमुख गजानन मोरे शहर प्रमुख विलास घोलप भास्कर राऊत शरद हाडे पंडितदादा देशमुख शंतनू बोंद्रे एकनाथ जाधव अरविंद माने अंकुश पाटील डॉ सपकाळ यांच्यासह शिवसेना भाजप युतीचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते