सराईत गुंड बाब्याची सैलानीत चाकू भोसकून हत्या, वर्चस्वाचा वाद गेला होता विकोपाला, 3 आरोपींना पोलिसांनी केली अटक

39

Motala live ..बुलढाणा तालुक्यातील सैलानी येथे एका 38 वर्षीय सराईत गुंडाची खून करण्यात आल्याची घटना घडली आहे.. बुलढाणा शहरातील इंदिरा नगर भागात राहणाऱ्या बाब्या उर्फ शेख नफीस शेख हफीज असे हत्या करण्यात आलेल्या गुंडांचे नाव आहे. बाब्या च्या हत्येने संपूर्ण सैलानी परिसर हादरून गेले आहे..2 टोळ्यांमधील वर्चस्वाच्या वादामुळे ही हत्या करण्यात आल्याची माहिती पोलीसनी दिली आहे.. एलक्स इनोक जोसेफ उर्फ रॉनी, शेख सलमान शेख अशफाक आणि सय्यद वाजिद सय्यद राजू उर्फ वाजिद टोपी सर्व असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत.

सैलानी येथे हाजी हजरत अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबा यांची दर्गा असून दरवर्षी पोळ्याच्या अमावश्याला दर्ग्यावर मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात त्यामुळे काल शुक्रवारी सैलानी मोठी गर्दी होती..रात्री भर्री बाबा दर्गा जवळ शेख नफीस शेख हफीज उर्फ बाब्यावर आरोपी एलक्स इनोक जोसेफ उर्फ रॉनी, शेख सलमान शेख अशफाक आणि सय्यद वाजिद सय्यद राजू उर्फ वाजिद टोपी सर्व रा.सैलानी यांनी बाब्या ची हत्या केली..रायपूर आणि बुलढाणा पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असून तो रिक्षा देखील चालवत होता.. त्याने सैलानी परिसरात आपली दहशत निर्माण केलेली होती.. दोन टोळ्यांमधील वर्चस्वाचा वाद विकोपाला गेला आणि बाब्याचा गेम करण्यात आला..माहिती मिळताच रायपूर पोलिसांनी घटनास्थळी घाव घेत पंचनामा केला. मृतकाच्या भावाच्या फिर्यादीवरून रायपुर ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला.. रायपूर मध्ये ठाणेदार राहिलेले दुर्गेशसिंग राजपूत यांना मदतीला बोलविण्यात आले..त्यांनी आरोपींचा शोध घेतला आणि दोघांना माहोरा जि. जालना येथून रात्रीच अटक केली तर तिसऱ्या आरोपीला सैलानी येथून अटक करण्यात आली आहे..शवविच्छेदनासाठी प्रेत बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले असून मोठी गर्दी जमलेली होती..