Motala live : लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा प्रतिशोध घेण्यासाठी ब्रिटिशअधिकाऱ्याची हत्या करणाऱ्या प्रमुख क्रांतीकारकांमध्ये भगतसिंग, सुखदेव सोबत राजगुरूंनी हुतात्म्य पत्करले. त्यांच्या फाशीच्या शिक्षेचे फर्मान झाल्यानंतर एक दिवस अगोदरच फाशी देऊन ब्रिटिशांनी हुकूमशाहीचे रणशिंग पुकारले होते. भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू च्या फाशीने स्वातंत्र्यलढ्याच्या क्रांतीला गती मिळाली असे मत अखिल भारतीय समता परिषदेचे कार्याध्यक्ष इंजि. शिवाजी जोहरे यांनी व्यक्त केले.
भारतीय स्वतंत्र संग्रामातील क्रांतिकारी शिवराम हरी राजगुरू यांच्या जयंती निमित्ताने 24 ऑगस्टला सायं.अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन बुलढाण्यात महानायक विचारमंच, ग्राम स्वराज्य समिती, किसान ब्रिगेड,आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले होते. यावेळी मनोगत व्यक्त करताना जोहरे यांनी उपरोक्त मत व्यक्त केले. ज्येष्ठ विचारवंत तथा सामाजिक कार्यकर्ते नारायणराव भाकडे यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या अभिवादन कार्यक्रमाला प्रबोधनकार ॲड.सतीशचंद्र रोठे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटचे मोताळा शहराध्यक्ष अबरार कुरेशी, ग्राम स्वराज्य समितीचे कमलाकर व्यवहारे, राम व्यवहारे, राष्ट्रीय बजरंग दलाचे प्रांत उपाध्यक्ष भूपेश पाटील,सामाजिक कार्यकर्ते देविदास पऱ्हाड, महानायक विचार मंच चे योगेश तायडे, अतुल सोनुने, कामगार संघटनेचे शेख अनिस, रमाई ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष सुरेखाताई निकाळजे, आदींची प्रमुख उपस्थितीत होती.
क्रांतिकारक राजगुरू यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून सामूहिक अभिवादनाने चर्चासत्राला सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित सर्वच मान्यवरांनी चर्चासत्रात सहभाग घेत अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले. संचालन संजय एंडोले यांनी तर आभार प्रदर्शन आशाताई गायकवाड यांनी व्यक्त केले.
यावेळी सतीश हिवरकर, महेश तायडे, नितीन गवई, गणेश सनीसे, सिंधुताई आहेर,पंचफुला गवई, जिजाबाई इंगळे, योगेश कोकाटे, शेख अफसर, इमरान शाह, निलेश ढकचवळे, मनोज पाटील, यासह शहरातील युवक व व्यवसायिकांनी चर्चासत्रात सहभाग घेत यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले. राष्ट्रगीताने चर्चा सत्राची सांगता करण्यात आली.