Motala live मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातील अजिसपूर मुळगाव असलेले तसेच स्थानिक राम नगर येथील रहिवाशी असलेले अनिकेत वर्षा रंगनाथ पवार यांनी संपूर्ण जिल्यात नावलौकिक निर्माण केला असून एकाचवेळी भारतीय लष्कर व तटरक्षक दलात उच्चपदाला गवसनी घालून मातृतीर्थ बुलढाणा जिल्यातील युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. अनिकेत पवार यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हें प्रबोधन विद्यालय बुलढाणा येथे झाले असून इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकीचे पदवी व पदव्युत्तर शिक्षण पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीरिंग, पुणे येथे पूर्ण झाले आहे. अनिकेत पवार यांनी एकाच वर्षात देशातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या भारतीय तटरक्षक दलात सहाय्यक कमांडंट पदी व नुकत्याच जाहीर झालेल्या भारतीय लष्कराच्या विविध पदांच्या निवडयादीत संपूर्ण देशातून 46 व्या क्रमांकावर झेप घेऊन महत्वाचे असलेले लेफ्टनंटपद प्राप्त केले. त्यांच्या या दैदीप्यमान दुहेरी यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून जिल्यातील युवकांनी पवार यांचा आदर्श घेऊन यश प्राप्त करण्याची आवश्यकता असल्याचे मत शैक्षणिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे. त्यांच्या निवडीबद्दल डॉ. अंकिता व डॉ. कांचन प्रकाश अंभोरे यांनी त्यांचे विशेष अभिनंदन करून भावी आयुष्याकरिता शुभेच्छा दिल्या.