[ मोताळा लाईव्ह ] राज्यातील महसुल विभागाचा महसुल सेवक (कोतवाल) कणा आहे. विभागातील अत्यंत महत्वाचा समजला जाणारा राज्याची विविध शासकीय धोरणे उपाययोजना, शासन स्तरापासुन ते गाव पातळीवरील महत्त्वाच्या योजना तसेच केंद्र शासनाच्या राज्यात सुरु असणाऱ्या महत्वाच्या योजना इत्यादींची अमलबजावणी राज्यातील अंतिम घटकापर्यंत. व्यवस्थित रित्या पोहचवण्यासाठी. राज्यातील महसूल यंत्रणा ते महसूल सेवक (कोतवाल) स्तरापर्यंत कार्यरत असते. महसूल विभाग हा राज्य शासनाचा क्षेत्रीय योजना राबविणारा. सर्वात प्रमुख विभाग आहे. महसुली कामाबरोबरच विविध प्रमाणपत्र देणे. कृषी गटांना शासनाच्या विविध योजना. अभियान मोहिमांचे समन्वय, आपत्ती टंचाई, जनगणना, निवडणुका राजशिष्टाचार. विविध जात प्रमाणपत्रे देणे अशा अनेक बिगर महसुली कामाची जबाबदारी महसूल विभागावर असते. त्याअर्थी सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन गरजांची निगडित असलेला. आणि त्यामुळे शासनाची प्रतिमा प्रतिबिंबित करणारा हा विभाग आहे.
क्षेत्रीय स्तरावर तलाठी साझा तसेच वरिष्ठ महसुली कार्यालयात महसूल सेवक (कोतवाल) २४ तास शासकीय सेवा देत असून महसूल सेवक (कोतवाल) आपली जबाबदारी योग्यरिता पार पाडत असतो. परंतु शासनाने अद्यापर्यंत महसूल सेवक (कोतवाल) पदास शासनाच्या वर्गीकृत कर्मचाऱ्या प्रमाणे सेवा सुविधा लागू केलेल्या नाही. त्यामुळे शासकीय सेवा करीत असताना महसूल सेवक (कोतवाल) यांना खूप अन्याय सहन करावा लागत आहे महसूल सेवक (कोतवाल) पदाचे महसूल यंत्रणेतील स्थान आणि कार्य लक्षात घेता महसूल सेवक (कोतवाल) यांना इतर महसूल कर्मचाऱ्या प्रमाणे शासकीय सेवा सुविधा देण्यासाठी चतुर्थ श्रेणीचा दर्जा देऊन महसूल सेवक कर्मचारी यांचा वरील अन्याय दूर करावा अन्यथा सर्व महसुल सेवक टप्या टप्याने आंदोलन करण्यात येईल . तरी महसुल सेवकांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा लकवरात लवकर लागु करावाअशी मोताळा तहसीलदार यांना मागणी निवेदनाद्वारे करणायात आली असून यावेळी मोताळा तालुका कोतवाल संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्तित होते