Motala live : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निरोगी भारताचे स्वप्न पाहिले असून ते साकार करण्यासाठी पारंपारिक भारतीय आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीचा विकास करण्यासाठी स्वतंत्र आयुष मंत्रालयाची निर्मिती केली आहे त्यामुळे आयुर्वेदाचे महत्व जगभरात पसरले आहे असे मत केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्र सरकारच्या निरोगी महिला … सक्षम कुटुंब ..हे अभियान संपूर्ण देशामध्ये राबविल्या जाणार आहे या अभियानाची सुरुवात आज 17 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मध्य प्रदेशातील थार येथुन झाली …या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमांमध्ये दाखविण्यात आले . यावेळी शिवसेनेचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिदे , केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले , राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह अन्य मान्यवरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकले .त्यानंतर मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात केद्रीय आयुषमंत्री प्रतापराव बोलत होते ते पुढे म्हणाले की देशातील आरोग्यसेवा मजबूत करण्यासाठी आणि पारंपारिक उपचारांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांवर त्यांनी प्रकाश टाकला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोगमुक्त भारताची संकल्पना डोळ्यासमोर ठेवली आहे . योगाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून देण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहीली आहे. युनानीसारख्या पारंपारिक औषध पद्धती पूर्वी दुर्लक्षित होत्या परंतु आता पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली त्यांना योग्य मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती श्री जाधव यांनी यावेळी दिली महाराष्ट्रात एक नवीन आयसीएमआर संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. आजार रोखण्यासाठी आणि उपचार करण्यासाठी अभियानात जास्तीत जास्त महिलांची आरोग्य तपासणी करून घ्यावी या अभियानामध्ये महाराष्ट्र राज्य हे देशात अग्रेसर ठरेल असा विश्वास आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. गेल्या ११ वर्षात देशभरातील लोकांचे जीवन सुधारण्यासाठी घेतलेल्या उपक्रमांवर त्यांनी प्रकाश टाकला. पंतप्रधान मोदी हे एकमेव जागतिक नेते आहेत ज्यांनी केवळ भारतासाठीच नव्हे तर इतर अनेक देशांसाठीही कोविड-१९ लसींची तरतूद सुनिश्चित करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. उपमुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांच्या राष्ट्राप्रती असलेल्या वैयक्तिक वचनबद्धतेबद्दलही सांगितले, त्यांच्या आईच्या निधनाच्या वैयक्तिक दुःखातही ते सार्वजनिक सेवेसाठी कसे समर्पित राहिले याची आठवण करून दिली. ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान’चा संदर्भ देत त्यांनी स्पष्ट केले की, महिलांमध्ये आजारांचे लवकर निदान होण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आणि कुटुंबांचे व्यवस्थापन त्यांची भूमिका महत्वाची असते हे ओळखून नारीशक्तीचे आयुष्य वाढविण्यासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला या अभियानांतर्गत राज्यभरात 75 हजारे शिबिरे येणार असल्यासही त्यांनी यावेळी सांगितले या कार्यक्रमाला महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते