Motala live : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर भारतीय जनता पक्ष मोठ्या ताकतीने निवडणूक रिंगणात उतरला असून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस “सेवा पंधरवाडा निमित्त मोताळा तालुक्यातील शेलापूर खु! येथे मोताळा मंडळातील भाजपा कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आ. चैनसुख संचेती, आ. श्वेताताई महाले पाटील व जिल्हाध्यक्ष मा.आ.विजयराज शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आ.चैनसुख संचेती यांनी सरकारच्या योजनांचे महत्व विषद करत ह्या “योजना घराघरात पोहचून जनतेची सेवा करा व निर्भिडपणे निवडणुकांना सामोरे जा, स्थानिक स्वराज्य संस्थांवर कमळाचा झेंडा फडकवा,पक्षाची ताकद पूर्णपणे कार्यकर्त्यां सोबत आहे ” असे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे.
बुलढाणा मतदार संघातील भाजपा कार्यकर्ता हा माझ्या साठी स्वतः च्या मतदारां इतकाच महत्वाचा असून आगामी निवडणुकांत प्रत्येक भाजपा कार्यकर्त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभी राहणार असल्याची ग्वाही आ.श्वेताताई महाले यांनी आपल्या भाषणातून दिली आहे.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनीही धुवाधार भाषनातून कार्यकर्त्यांत नवचेतना भरली. “मोताळा तालुक्यात भाजपची मोठी ताकद आहे परंतु भाजपा कार्यकर्त्यांचा वापर निवडून येण्यासाठी करून घेतला जातो व नंतर त्यांना वाऱ्यावर सोडले जाते. “आधी भाजपच्या भरवश्यावर निवडून यायचे आणि विजयी झाल्यावर भाजपा कार्यकर्ते व मतदारांचा अर्वाच्छ भाषेत अवमान करायचा अश्या “एहसान फरामोशी” करणाऱ्यांना आगामी निवडणुकांत त्यांची जागा दाखवुन देऊ व “आता फक्त कमळच” हे स्वप्न पूर्ण करू असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी केले आहे.
मेळाव्यात भाजपा नेत्यांनी आपल्या भाषणातून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे जोरदार रणशिंग फुंकले असून, कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना या मेळाव्यातून देण्यात आले आहे. या मेळाव्यातून कार्यकर्त्यांचा उत्साह आता शिगेला पोहोचला आहे.
या मेळाव्यास भाजपा प्रदेश उपाध्यक्ष आ. चैनसुख संचेती, आ.श्वेताताई महाले पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांसह भाजयुमो जिल्हाध्यक्ष यश संचेती, जिल्हा उपाध्यक्ष गजानन घोंगडे,जिल्हा सचिव प्रवीण खर्चे,अनु.जमातीचे जिल्हाध्यक्ष गजानन सोळंके, बाजार समिती संचालक सुनील देशमुख, भाजपा अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सलीम चुनावाले, अभियानाचे संयोजक चंद्रकांत बरदे, बुलढाणा शहराध्यक्ष मंदार बाहेकर, माजी जि. प.सदस्य पुरुषोत्तम नारखेडे, जेष्ठ नेते पुरुषोत्तम लाखोटीया, जिल्हा सरचिटणीस पंजाबराव धनवे, मंडळ अध्यक्ष सचिन शेळके, भाजयुमो मंडळ अध्यक्ष दत्ता पाटील,महिला मोर्चा अध्यक्ष सौ अंजलीताई नारखेडे, जिल्हा सचिव अशोक किंहोळकर, जिल्हा सचिव अनंता शिंदे, नगरसेवक विजय सुरडकर, सहकार आघाडी जिल्हा संयोजक मोहन पवार, वैद्यकीय आघाडी जिल्हा संयोजक डॉ राजेश्वर उंबरहंडे ई मान्यवरांची उपस्थिती होती. या मेळाव्याचे सूत्र संचालन व विशेष नियोजन भाजपा युवा नेते तथा शेलापूर पिंप्रीगवळी जि.प.सर्कल प्रमुख उमेश वाघ यांनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शेलापूर येथील भाजपा कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.