शेतकऱ्यांच्या बांधावर जावुन केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी केली अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेत जमिनीची पाहणी..! पंचनामाचे चावडी वाचन करून घेण्याचे शेतकऱ्यांना केले आवाहन…!!

18

Motala live : राज्यात अतिवृष्टीमुळे 70 लाख हेक्टर पेक्षा जास्त शेतजमिनीचे नुकसान झाले आहे .दिवाळीपूर्वी या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी युद्ध पातळीवर पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत असे केंद्रीय प्रतापराव जाधव यांनी सांगितल  बुलढाणा आणि मोताळा तालुक्यात तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला या अतिवृष्टीमुळे शेतात पाणी तुंबुन शेत मालाचे नुकसान झाले अनेकांच्या शेत जमिनी खरडून गेल्यात यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आज 29 सष्टेबर रोजी केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला नुकसानग्रस्त शेताच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे या आपत्तीला शेतकऱ्यांनी हिमतीने सामोरे गेले पाहिजे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासंदर्भात अधिकारी कर्मचाऱ्यांना निर्देशित केले आहे परंतु शेतकऱ्यांनी गावाचे तलाठी कृषी सहाय्यक यांच्या सोबत समन्वय साधुन यांनी योग्य पद्धतीने नुकसानीची पंचनाम्ये करून घ्यावेत. झालेल्या पंचनाम्याचे चावडी वाचन करून घ्यावे जेणेकरून कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी सरकारच्या मदतीपासून वंचित राहणार नाही असे आवाहन केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधतांना केले आज केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी बुलडाणा तालुक्यातील गिरडा मोताळा तालुक्यातील नळकुंड उबाळखेड येथे ‘झालेल्या नुकसानीची पाहणी बांधावर जाऊन केली त्यावेळी त्यांच्यासोबत आमदार संजय गायकवाड जिल्हाप्रमुख ओमसिग राजपूत तालुकाप्रमुख धनंजय बारोटे मोताळा प्रमुख रामदास चौथंकर महिला आघाडीच्या अनुजा ताई सावळे चांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते