बुलडाणा जिल्हा परिषद मधील शिवाजी सभागृहाच्या टॉवर चढून 2 युवकांचे शोले स्टाईल आंदोलन

36

[मोताळा लाईव्ह ] विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेच्या इमारत टॉवरवर चढून दोघांचे आंदोलन सुरु केले असून बुलढाणा जिल्हातील मेहकर तालुक्यातील भोसा येथील ग्रामपंचायत सरपंच चित्रलेखा चव्हाण यांचे पती दिनकर चव्हाण यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून बांधकाम करून लाखो रुपयांचा भ्रष्टावर केल्याचा आरोप करत सरपंच चित्रलेखा चव्हाण यांना तात्काळ पदमुक्त करावे यासह इतर मागण्यासाठी संजय करवते आणि सचिन जाधव या दोघांनी बुलढाणा जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर असलेल्या इमारतीच्या टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले आहे. पेट्रोल ने भरलेली एक बॉटल देखील त्यांच्यासोबत आहे, आंदोलकांनी यापूर्वी आज आत्मदहनाचा इशारा दिला असल्याची माहिती मिळत आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्या मागणी संदर्भात चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.मात्र गेल्या दोन तासापासून आंदोलन सुरु असून आद्यप सुद्धा तोडगा निघाला नाही आहे