बुलढाण्यात आदिवासी आरक्षण बचाव आक्रोश मोर्चाचे आयोजन

21

[ मोताळा लाईव्ह ] बंजारा,धनगर समाज अनु.जमाती प्रवर्गातून आरक्षणाची मागणी करत असून याला आदिवासी समाजाने तीव्र विरोध केला असून या मागणीच्या विरोधात सोमवार 6 ऑक्टोबर २०२५ रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यलयावर सकल आदिवासी समाज बांधवांच्या वतीने भव्य मोर्चा धडकणार आहे,अशी माहिती पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे.

सदर मोर्चा हा बुलढाणा येथील जयस्तंभ चौकातील वीर एकलव्य महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून 6 ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी 12 वाजता सुरु होणार आहे.हैद्राबाद गॅजेट हा महाराष्ट्रात लागू करण्यात येऊ नये,ही प्रमुख मागणी राहणार आहे.या पत्रकार परिषदेत आदिवासी समाजाचे नेते मधुकर पवार,नंदिनी टारपे,विनोद डाबेराव, गजानन सोळंके,विजय मोरे उपस्थिती होते.