बावनबीर गावातील दगडफेक प्रकरणी केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी ग्रामस्थांशी साधला संवाद

19

Motala live : संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर गावात देवीच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आज गावाला भेट देऊन पाहणी केली.

मिरवणुकीदरम्यान दोन गटात वाद होऊन दगडफेक झाल्याच्या घटनेमुळे गावात तणाव निर्माण झाला होता. या घटनेत २० ते २५ जण जखमी झाल्याची माहिती असून पोलिसांकडून गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी बावनबीर गावात जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधला आणि घटनेची सविस्तर माहिती घेतली.
तसेच मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी पोलिस प्रशासनाला आवश्यक ती दक्षता घेण्याचे निर्देश दिले. गावामध्ये जे समाजकंटक जे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यावर व तात्काळ कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधिकारी यांना सूचना दिल्या आहेत.
यावेळी बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री संजय सावकारे,अप्पर पोलीस अधीक्षक श्री.श्रेणिक लोढा,ठाणेदार चंद्रकांत पाटील,शिवसेना जिल्हाप्रमुख शांताराम दाणे,उपजिल्हाप्रमुख राहुल मारोडे,संतोष डिवरे,तालुका प्रमुख केशव ढोकणे,रामा थारकर,सुनिल जुनारे,अजय पारस्कर,युवासेना उपजिल्हा प्रमुख अमोल मोदे,श्री. चेतन पाटील घिवे,श्री. शाम आकोटकार यांच्यासह शिवसेना महायुतीचे पदाधिकारी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.