खामगाव-
कॉलेज ऑफ मॅनेजमेंट तर्फे वाटर फिल्टर चे अनावरण कार्यक्रम येत्या २२ ऑक्टोबर रोजी पार पाडण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून उप कार्यकारी अभियंता (अतिरिक्त) म.रा.वि.वि.कंपनी मर्या, खामगाव शैलेशजी मुळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांनी वाटर प्युरीफायर यंत्रणा कशी अनेक धोकादायक आजारांचा सामना कमी करते. तसेच आरोग्यावर परिणाम करणारे क्लोरीन व बॅक्टेरिया काढून टाकते व जंत मुक्त पाणी करते . हे विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन दिले.
या वेळी लक्ष्मीनारायण ग्रुप चे अध्यक्ष श्री तेजेन्द्रसिंग चौहान ,संचालिका राजकुमारी चौहान, मॉडेल स्कूल चे मुख्याध्यापक श्री सुदाम जाधव, कॉलेज ऑफ मॅनेजमेंट चे मुख्याद्यापक श्री राहुल अग्रवाल सर , अंकित मुळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमा दरम्यान श्री. तेजेन्द्रसिंग चौहान व राजकुमारी चौहान यांनी जल शुद्धीकरणाचे फायदे विध्यार्थ्यांना समजून सांगितले.
कार्यक्रमा ला उपस्थित प्रा. ज्योती अग्रवाल, प्रा. कोमल उन्हाळे, प्रा. धनश्री चंदन. प्रा. हर्षा भांडे प्रा. रुचिता तायडे प्रा. अंकिता राठी, प्रा. स्नेहा सावळे, प्रा. वैशाली ममतकार , प्रा. पायल भंसाली, प्रा. पुजा अत्तरकर, प्रा. अतुल पाटील, प्रा. सी.एस. घाटे, प्रा. आकाश खंडेराव प्रा. अजय घाटे, शिक्षकेतर कर्मचारी वंदना जाधव, रुपाली खंडागळे, विशाल साबे, स्वप्नील शिंदे, नंदू चव्हाण यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमा चे प्रास्ताविक विकास पल्हाडे तर आकाश खंडेराव यांनी संचालन व आभार मानले.