(मोताळा लाईव्ह ) केंद्र शासनाने प्रधानमंत्री मत्स्य किसान समृध्दी सह-योजनेंतर्गत सर्व पात्र मच्छिमार व मत्स्यकास्तकार यांना किसान क्रेडीट कार्डची सुविधा उपलब्ध्ा करुन देण्यासाठी सन 2024-25 करीता दि. 31 मार्च 2025 पर्यंत देशव्यापी किसान क्रेडीट कार्ड (केसीसी) मोहिम राबविण्याबाबतचे निर्देश दिले आहेत. या मोहिमेंतर्गत सर्व पात्र मच्छिमार, मत्स्यसंवर्धक व मत्स्यव्यवसायांनी नॅशनल फिशरीस डिजीटल प्लॅटफॉर्म (एनएफडीपी) वर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मत्स्यव्यवसायाच्या अधिकाधिक विकासात्मक योजना राबविण्यासाठी धोरणात्मक दृष्टीकोनातून तसेच प्रधानमंत्री मत्स्य किसान समृध्दी सहयोजनेचा लाभ मिळण्यासाठी देशातील मत्स्यव्यवसायाशी संबंधितांची एनएफडी वर नोंदणी करण्यासाठी केंद्र शासनाने सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालय, कॉमन सर्विस सेंटर, सेवा केंद्र व सेतू यांना प्राधिकृत केलेले आहे. मच्छिमार व मत्स्यव्यवसायिक यांनी http://NFDP.dof.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. त्याकरीता आपल्या गावानजीकच्या सेवा केंद्र, कॉमन सर्विस सेंटर व सेतू येथे संपर्क साधावा. तसेच आपल्या मत्स्यव्यवसायिक संस्थेची व संस्थेतील सभासदांची तसेच मत्स्यव्यवसायिक कोणत्याही संस्थेत सभासद नसल्यास त्यांनी आपल्या मत्स्यव्यवसायाशी संबंधित कोणतेही पूरक कागदपत्रे एनएफडीपी संकेतस्थळावर अपलोड करुन आपली नोंदणी करुन घ्यावी. नोंदणीअंती प्राप्त प्रमाणपत्राची एक छायाप्रत सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय, प्रशासकीय इमारत, बसस्टँडच्या समोर, बुलढाणा येथे सादर करावी.
एनएफडीपी नोंदणीसाठी मत्स्यव्यवसायिकाचे आधारकार्ड, बँक पासबुक व आधार जोडणी असलेला मोबाईल आवश्यक असून त्यासह नजीकच्या सोईच्या सेवा केंद्र किंवा सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय, प्रशासकीय इमारत, पहीला मजला, एसटी डेपोच्या समोर, धाड रोड, बुलढाणा येथे 07262-242254 व http://pmmkssy.dof.gov.in वर संपर्क करावा, असे आवाहन मत्स्यव्यवसायचे सहायक आयुक्त सु.ग. गावडे यांनी केले आहे.