सोयाबीन-कापुस व रब्बीचा पिक-विमा त्वरित शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करा अन्यथा रस्त्यावर उतरू.

36

[ मोताळा लाईव्ह ]  पिक-विमा कंपनीच्या उदासीन धोरणामुळे शेतकऱ्यांना होतो त्रास खरंतर मागील वर्षी (२०२३) जळगाव (जा.) व इतर तालुक्यामध्ये निसर्गाच्या लहरीपणा व सततचा पाऊस पडल्याने आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे सोयाबीन-कापूस पिकाचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. एवढे पिकाचे नुकसान होऊन देखील अनेक शेतकरी पिक विमा मिळण्यापासुन अजुनही वंचित आहेत.

पिकविम्या पासुन वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी पिक विमा मिळावा यासाठी अनेक वेळा रस्त्यावर उतरून आपल्या नुकसानीच्या भावना लोकशाही मार्गाने आंदोलनाच्या माध्यमातुन सरकारला व पिक-विमा कंपनीला सांगितल्या होत्या. परंतु आतापर्यंतही पिक विमा कंपनीने सोयाबीन-कापुस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा केलेला नाही.

तसेच रब्बी पिकाचे सुद्धा अशाच प्रकारे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना रब्बीचा पीक विम्या पासुन वंचित राहावे लागत आहे. रब्बी पिकाच्या पिक विम्या मध्ये अनेक शेतकरी पात्र असतांनी सुद्धा त्यांना पिक-विमा मिळाला नाही. यामध्ये पीक-विमा कंपनी प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या भुमिका घेत वेगवेगळे निकष काढुन शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करुन वेळ मारुन देत आहे.

कुठंतरी उभ्या जगाचा पोशिंदा म्हणून शेती मातीत राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या भावनेचा आदर ठेवुन पिक विमा कंपनीने त्वरित सोयाबीन-कापूस व रब्बीचा पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावा ही मागणी घेऊन युवा आंदोलक अक्षय पाटील यांनी (Aic) पिक-विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी यांच्याशी दिनांक १९/१२/२०२४ चर्चा करून त्यांना निवेदन दिले.

जर पिक विमा कंपनीने शेतकऱ्याच्या खात्यामध्ये त्वरित पिक विमा जमा केला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवा आंदोलक अक्षय पाटील यांनी पिक विमा कंपनीच्या प्रतिनिधीला दिला.