अवैध सावकारांचे कर्दनकाळ सहाय्यक निबंधक आमलेंचा सत्कार.

25

[मोताळा लाईव्ह ] : अवैध सावकारांचे कर्दनकाळ ठरलेले सहाय्यक निबंधक मोताळा जी.जे.आमले आणि   सहकाऱ्यांनी  केलेल्या कारवाईने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. त्यामुळे ग्राम स्वराज्य समिती,आझाद हिंद शेतकरी संघटना,रमाई ब्रिगेड, किसान ब्रिगेड, मातृतीर्थ  रणरागिणी संघटना, शाहीर संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने 21 जुलैला जिल्हा निबंधक बुलढाणा कार्यालयात जाऊन अधिकारी कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त करीत पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन शेतकऱ्यांच्या वतीने सत्कार केला.

अनधिकृत सावकारीतून असंख्य शेतकरी कास्तकारांना भूमिहीन होण्याची वेळ आली आहे. एकीकडे कर्जबाजारी,नैसर्गिक आपत्ती,नापिकी आणि शेतमालाला भाव नसल्यामुळे शेतकरी मेटाकूळीस आला आहे. अशातच अनधिकृत सावकारांनी शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत त्यांना भूमिहीन करण्याचा कुटिल डाव उधळून टाकत असाह्य  शेतकऱ्यांना आधार देण्याचे  काम प्रशासकीय अधिकारी म्हणून निर्भीडपणे केले. अशीच कारवाई जिल्ह्यात सर्वत्र झाल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल करिता आम्ही अशा निस्वार्थ निर्भीड अधिकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. यासाठी भूमिपुत्र सत्कार आझाद हिंदच्या वतीने करण्यात आल्याचे यावेळी ॲड.सतीशचंद्र रोठे पाटील यांनी जाहीर केले.

अनधिकृत सावकार ग्रस्त पीडितांनी संपर्क करावा.. जि.जे.आमले.

प्रशासनात राहून शेतकरी दुःखितांचे अश्रू पुसणे हे माझे कर्तव्य आहे. कर्तव्य बजावत असताना जनसामान्यांनी सहकार्य करून पाठीशी उभे राहणे निश्चितच चांगल्या कामाला गती देण्याचे काम करते. अनधिकृत सावकारी संदर्भात सावकार ग्रस्त पीडित नागरिकांनी, शेतकऱ्यांनी जिल्हा निबंधक सावकारी कार्यालय येथे संपर्क करावा.असे आवाहनही यावेळी सहाय्यक निबंधक बुलढाणा मोताळा जी.जे.आमले यांनी केले.

शेतकरी दूत ठरलेले अधिकारी..
अमरावती विभागातूनही प्रथम:

जिल्हा निबंधक सावकारी यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक निबंधक मोताळा जी.जे. आमले, यु.के सुरळकर,कु.स.के.घाटे,वाय.यम.घुसळकर,आर.के.डहाके, यन.एस. सोनवणे, पी.व्ही.कीकराळे  यांनी केले. तसेच महाराष्ट्र शासनाच्या शंभर दिवस कृती कार्यक्रमांतर्गत विभागातून सर्वोत्कृष्ट कार्य केल्याबद्दल विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था अमरावती यांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था बुलढाणा/मोताळा जी.जे.आमले उत्कृष्ट अधिकारी म्हणून गौरविण्यात आले. करिता केलेल्या भूमिपुत्र सत्कारा प्रसंगी प्रबोधनकार ॲड.सतीशचंद्र रोठे पाटील, सुरेखाताई निकाळजे,आशाताई गायकवाड,शाहीर सिंधुताई अहेर,पंचफुला गवई, सुमनताई राजपूत, भारती अवचार, सविता इंगळे, छाया पानपाटील, अन्नपूर्णा चाफेकर,कमलाकर व्यवहारे, राम व्यवहारे, निलेश ढकचवळे, भूपेश पाटील, सुशांत पाटील यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.