(मोताळा लाईव्ह ) बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून आता उबाठा गटाचे असलेले नेते डॉ मधुसूदन सावळे गेल्या अनेक वर्षापासून शिवसेने मधे सक्रिय नेते म्हणून यांचा सहभाग असून गेल्या तेरा वर्षांपासून ते या ठिकाणी पक्षाकडे उमेदवारी मागत आहे मात्र अद्यापही त्यांना पक्षाने उमेदवारी दिली नाही 2014 मध्ये मोठा कार्यकर्त्यांचा मोठा फौज फाटा घेऊन ते मातोश्रीवर दाखल झाले होते तेव्हा त्यांना आश्वासन देण्यात आले होते की पुढच्या वेळेस नक्की तुम्हाला संधी दिली जाईल केला मात्र तरी सुद्धा त्यांना संधी मिळाली नाही त्यामुळे आता डॉ मधुसूदन सावळे म्हणतात की मी आता थांबणार नाही मी उमेदवारी अर्ज दाखल करणारच असल्याचे त्यांनी संगितले आहे त्यामुळे आता बुलडाणा विधान सभा मतदार संघात उबाठा गटामध्ये बंडखोरी होईल का.?