महायुती पदाधिकारी,कार्यकर्तासंवाद बैठक संपन्न…!

19

(मोताळा लाईव्ह ) दिनांक- २० सप्टेंबर २०२४ रोजी बुलढाणा शहरातील बि.के लॉन्स येथे शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी महायुतीचे अधिकृत उमेदवार संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची तसेच कार्यकर्त्यांची भव्य संवाद बैठक पार पडली…!यावेळी त्याठिकाणी सर्वांनी एकमताने एक दिलाने महायुवती चे असलेले उमेदवार संजय गायकवाड यांच्या प्रचारार्थ येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये झोकून द्यायचे आहे,तसेच विकासाचा हा रथ असाच निरंतर चालू ठेवण्याचे आवाहन उपस्थितांना केले…!यावेळी त्याठिकाणी शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारिणी सदस्य मृत्युंजय संजय गायकवाड,धर्मवीर युथ फाउंडेशन अध्यक्ष पृथ्वीराज संजय गायकवाड,उपजिल्हाप्रमुख भोजराज पाटील,भाजपा जिल्हा सचिव सुनील देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अनुजाताई सावळे,अखिल भारतीय वारकरी महामंडळ जिल्हाध्यक्ष ह.भ.प शारदाताई कमाणी,भाजपा तालुका अध्यक्ष मोहन पवार,भाजपानेते प्रकाश पडोळ,राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाप्रमुख मनीष बोरकर,राष्ट्रवादी काँग्रेस शहर प्रमुख मंगेश बिडवे,राष्ट्रवादीचे नेते रामेश्वर पाटील तायडे,किसानसेना जिल्हाप्रमुख संदीप गायकवाड, वाहतूक सेना जिल्हाप्रमुख राजेश मुंगळे,मोताळा तालुका प्रमुख रामदास चौथनकर,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष निलेश देठे,भाजपा मोताळा तालुका प्रमुख गजानन घोंगडे,बुलडाणा तालुका प्रमुख धनंजय बारोटे, शिवसेना महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख पारसकर ताई,मोताळा तालुका महिला आघाडी प्रमुख अंजनाताई खूपराव,शिवसेना शहरप्रमुख गजेंद्र दांदडे, युवासेना शहर प्रमुख श्रीकांत गायकवाड,महिला आघाडी शहर संघटक वैशालीताई ठाकरे,अशोक इंगळे,अर्जुन दांडगे,सूत्रसंचालक प्रा.अनिल रिंढे यांच्यासह शिवसेना,भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी शिवसैनिक नगरसेवक शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते…!