( मोताळा लाईव्ह ) केंद्रीय निवडणूक आयोगाने सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024 निवडणूकीचा कार्यक्रम घोषित झाला असून दि. 15 ऑक्टोंबर 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने आज दि. 22 ऑक्टोबर रोजी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सिंदखेडराजा मतदारसंघाला भेट दिली. यावेळी मतदान केंद्रातील सोयीसुविधाची पाहणी करुन तहसील कार्यालयामधील नामांकन अर्ज मिळणाऱ्या कक्षाला भेट दिली.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संजय खडसे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सिंदखेडराजा अजित दिवटे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार देऊळगाव राजा वैशाली डोंगरजाळ, गट विकास अधिकारी देऊळगाव राजा मुकेश माहोर, मुख्याधिकारी नगरपरिषद सिंदखेड राजा प्रशांत व्हटकर, निवडणुक नायब तहसीलदार सिंदखेड राजा मनोज सातव, निवडणूक नायब तहसीलदार प्रवीण घोटकर, नायब तहसीलदार सिंदखेडराजा अस्मा मुजावर, नायब तहसीलदार सिंदखेडराजा प्रवीणकुमार वराडे, नायब तहसीलदार देऊळगाव राजा सायली जाधव, नायब तहसीलदार देऊळगाव राजा प्रांजल पवार, नोडल अधिकारी प्रसारमाध्यम अंकुश म्हस्के, श्री. पडघान आदि उपस्थित होते.
निवडणूक उमेदवारांचे अर्ज हे मा. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या तहसील कार्यालय येथील दालनामध्ये अर्ज स्विकारले जाईल. अर्ज स्वीकृतीसाठी उमेदवारा सोबत फक्त 5 व्यक्तींनाच प्रवेश दिला जाणार आहे. आज दि. 22 ऑक्टोबर 2024 रोजी 24-सिंदखेडराजा मतदारसंघांसाठी 19 व्यक्तींनी एकूण 36 नामांकन अर्ज घेतले आहेत. तर नामनिर्देशन अर्ज कोणीही दाखल केले नाही.