एटीएम च्या अदलाबदला करून एका भामट्याने चक्क दोन लाख पंधरा हजार रुपये काढले

22

मोताळा तालुक्यातील असलेल्या मूर्ती गावातील शेतकरी महादेव धोंडू ठाकरे यांनी बोराखेडी पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून दिनांक 15 ऑक्टोबर च्या संध्याकाळी एका भामट्याने त्यांचे एटीएम मधून दोन लाख पंधरा हजार रुपये काढण्याचा त्यांना मेसेज प्राप्त झाला
मूर्ती गावातील शेतकरी महादेव धोंडू ठाकरे दिनांक 15 ऑक्टोंबर च्या संध्याकाळी पाचच्या सुमारास त्यांना पैशांचे काम असल्यामुळे मोदळा येथील असलेल्या एचडीएफसी बँक मध्ये पैसे काढण्यासाठी आले त्या ठिकाणी त्यांनी २० हजार रूपे काढले बँक एटीएम मधले पैसे संपल्यामुळे त्या ठिकाणी पैसे निघत नसल्याने त्यांनी मोताळा येथील असलेल्या एसबीआय बँक गाठली व त्या ठिकाणी पैसे काढण्यासाठी असल्या एटीएम मध्ये गेले त्या ठिकाणी अगोदरच तीन इसम या ठिकाणी होते त्यांनी रांगेत उभे राहून या ठिकाणी त्यांचे एटीएम पैसे काढण्यासाठी मशीन मध्ये टाकले मात्र तरीसुद्धा पैसे निघत नसल्याने संबंधित इसमाने सांगितले की पैसे निघत नाही आहे कॅश संपली आहे त्या ठिकाणी इतरही समाने त्यांना बोलण्यामध्ये गुण केल्यावर एटीएम चे अदलाबदल करून त्या ठिकाणाहून निघून गेले त्यानंतर महादेव ठाकरे सुद्धा पैसे निघत नसल्यामुळे आपल्या घरी आले मात्र घरी आल्यानंतर त्यांना त्यांच्या मोबाईल क्रमांक वरती त्यांच्या खात्यातून पैसे वितरण झाल्याचा मेसेज आला त्यानंतर त्यांनी मोताळा येथील एटीएम गाठले मात्र त्या ठिकाणी कोणी मिळून आले नाही