बुलढाण्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ; सकल भागात साचले पाणी

16

बुलडाणा : गेल्या चार दिवसांपासून परतीच्या पावसाने बुलढाणा जिल्ह्यात मुक्काम केला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.. अनेक शेतकऱ्यांचे शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.. तर काही ठिकाणी घरांची देखील पडझड झाली आहे.. आज सायंकाळी सहा वाजल्यापासून बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर चिखली सिंदखेडराजा बुलढाणा या तालुक्यामध्ये विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस कोसळत आहे.. काही ठिकाणी सकल भागात पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.. तर या पावसामुळे मलकापूर- सोलापूर महामार्गावरील हातनी पुलावर पाणी आल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.. तसेच बुलढाण्यात विद्युत पुरवठा ही खंडित झाला आहे..