मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये आदर्श बोराखेडी शाळा विभागात दुसरी

17

मोताळा :बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा लगत असलेली आदर्श जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोराखेडी उपक्रमशील शाळा म्हणून नावलौकिक आहे शैक्षणिक गुणवत्ता नाविन्यपूर्ण उपक्रम शिष्यवृत्ती तसेच भौतिक सुविधांच्या माध्यमातून शाळेचा विकास बाबतीत जिल्ह्यातील आदर्श उदाहरण म्हणजे आदर्श जिल्हा परिषद शाळा बोराखेडी शासकीय योजना , उपक्रम ,स्पर्धा यामधे आदर्श जिल्हा परिषद शाळा बोराखेडी सातत्याने प्राविण्य प्राप्त करत असते सन 2024 वर्षांमध्ये शासनामार्फत राबित आलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 मधे 5 आँगष्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत हे अभियान राज्यात राबविण्यात आले. राज्यातील संपूर्ण शाळेने सदर अभियानात सहभाग घेतला होता . बुलढाणा जिल्ह्यामधील आदर्श जिल्हा परिषद बोराखेडी शाळा सुद्धा या स्पर्धेमध्ये समाविष्ट होती सदर स्पर्धेमध्ये 39 प्रकारचे निकष समाविष्ट करण्यात आले होते 150 गुणांची ही स्पर्धा होती सदर स्पर्धेमध्ये प्राविण्य प्राप्त करत आदर्श जिल्हा परिषद शाळा बोराखडी यांनी विभागात दुसरा क्रमांक पटकावला असून ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा सुध्दा खूप चांगल्या असल्याचा सन्मान विभाग स्तरापर्यंत वाढवला आहे दिनांक 14 ऑक्टोबर रोजी जमशेद बाबा नॅशनल सेंटर नरिमन पॉईंट मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिक्षण मंत्री दिपक केसरकर शिक्षण प्रधान सचिव कुंदन मँडम शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्या उपस्थितीत राज्यातील प्राविण्य प्राप्त शाळांना सन्मानित करण्यात आले सदर समारंभात मुख्याध्यापक अनिल चव्हाण व संपूर्ण शिक्षक यांना आमंत्रित करून द्वितीय क्रमांकाचे बक्षीस व ट्राँफी देऊन सन्मानित करण्यात आले मुख्यमंत्री यांनी शाळेच्या विकासासाठी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही स्पर्धा आयोजित केली होती ज्या शाळा शिक्षक विद्यार्थी गुणवत्ता विकासाची काम करतात त्या शिक्षकांना खूप मोठी संधी या स्पर्धेतून मिळाली आहे सदर स्पर्धेतून मिळणाऱ्या बक्षीसातून शाळेच्या शैक्षणिक व भौतिक विकास करण्याची ही संधी शासनाने उपलब्ध करून दिली होती त्या संधीचा फायदा घेत स्पर्धेतील संपूर्ण निकष पूर्ण करत आदर्श जिल्हा परिषद शाळा बोराखेडी यांनी अमरावती विभागात द्वितीय क्रमांक पटकावत बोराखेडी शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. शाळेला मिळालेल्या यशात शालेय समिती, गावकरी, ग्रामपंचायत तसेच प्राचार्य जे ओ भटकर, शि‌क्षणाधिकारी बाळासाहेब खरात, अनिल अकाळ , वैशाली ठग उपशिक्षणाधिकारी अनिल देवकर, उमेश जैन गटविकास अधिकारी समाधान वाघ साहेब गटशिक्षणाधिकारी मा मनोहर धंदर साहेब, विस्तार अधिकारी डि डि पाटील महाविर जैन साहेब मोताळा केंद्र प्रमुख सुनिता शिंदे मँडम यांचे खुप सहकार्य मार्गदर्शन व प्रेरणा मिळाली विभागीय बक्षीसामुळे शाळेत शिक्षक व विद्यार्थी यामधे खूप आनंदाचे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असुन सोशल मीडिया च्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे..

शाळा व विद्यार्थी विकासासाठी 12 वर्षांपासून सातत्याने केलेल्या अथक परिश्रमाची पावती मिळाली असे मत मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांनी व्यक्त केले आहे