23 मोटार सायकल चोरी करणाऱ्या चोरट्यांना बुलढाणा पोलिसांनी ठोकल्या बेड्या

18

बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोटार सायकल चोरीच्या गुन्हांची गंभीर दखल घेवून बुलढाणा पोलिसांनी मोटार सायकल संबंधीत गुन्ह्याची उकल करत 04 आरोपी निष्पन्न केले आहेत. त्यातील अकोला जिल्ह्यातून तीन आरोपी तसेच नांदेड जिल्हा ता. माहूर येथून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. अकोला जिल्ह्यातील 24 वर्षीय आरोपी विशाल दुर्योधन इंगळे, 25 वर्षीय अंकीत प्रमोद मुलनकर तसेच नांदेड जिल्ह्यातील 31 वर्षीय विकास बबनराव मोरे व 38 वर्षीय सिध्दार्थ श्रावण खरात या आरोपींना अटक केली आहे. आरोपींच्या ताब्यातील हिरो स्प्लेंडर कंपनीच्या 17 मोटार सायकल , हिरो HF DELUXE कंपनीच्या 04 मोटार सायकल आणि होंडा अॅक्टीव्हा कंपनीच्या 02 मोटार सायकल असे एकूण 23 मोटारसायकल जप्त केल्या असून एकूण 9 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी दिली आहे.