मोताळा : विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आज सकाळी उत्पादन शुल्क विभागाने सापळा रचून अवैध दारूचा साठा जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग खामगावचे दुय्यम निरीक्षक दत्तात्रय कुटेमाते यांना अवैध दारू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली यानंतर सायंकाळी मोताळा ते नांदूरा रोडवर असलेल्या लोनवडी फाट्याजवळ मोटार सायकल वरुन दारू घेऊन जात असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने देशी दारूच्या 336 बॉटल म्हणजेच 7 बॉक्स मिळून आले. तसेच शेंबा येथे 14 बॉक्स असे एकूण आचार संहिता लागू होताच 21 देशी दारूचे बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. दुचाकी वरुन अवैध दारूची वाहतूक केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करून 1 लाख 23 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पवन तायडे, अमोल भिडे, सागर भिडे यांना अटक करण्यात आली आहे अशी माहिती देत निवडणूका खुल्या वातारणात पार पडाव्या यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाला सहकार्य करावे असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभाग निरीक्षक विक्रांत पाटील यांनी दिली आहे…….