बुलढाणा विधानसभा मतदारसंघात फूट भाजपचे विजयराज शिंदे यांच्याकडून उमेदवार अर्ज दाखल..

27

(मोताळा लाईव्ह ) बुलढाणा विधानसभा मतदारसंघांमध्ये फूट पडली असून महायुतीमध्ये असलेले घटक पक्ष भाजप आणि शिवसेना शिंदे गट यामध्ये आता फूट पडले असून बुलढाणा विधानसभा मतदारसंघाची ही जागा शिवसेनेला गेले असून मात्र या ठिकाणी भाजपचे असलेले माजी आमदार विजयराज शिंदे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे बुलढाणा विधानसभा मतदारसंघांमध्ये आता महायुतीमध्ये फूट पडले असून आमदार विजयराज शिंदे यांनी बंडखोरी केली असुन उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यांनी बोलताना सांगितले की विद्यमान असलेले आमदार संजय गायकवाड यांनी नरेंद्र मोदी तसेच देवेन्द्र फडणवीस व माझ्यावरती मोठ्या प्रमाणात खालच्या स्तरावर टीका केली आहे विद्यमान असलेले आमदार संजय गायकवाड यांनी माफी मागावी असे विजयराज शिंदे यांनी म्हटले आहे…..