विजयराज शिंदे यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट म्हणाले …. ?

130

(मोताळा लाईव्ह ) बुलढाणा विधानसभा मतदार संघात भाजप कडून बंडखोरी करण्यात आली असून भाजपचे असलेले विजयराज शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे बुलढाणा विधानसभा मतदारसंघात ही जागा महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाच्या वाटेला गेली आहे मात्र भाजपचे असलेले माजी आमदार विजयराज शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यामुळे आता बुलढाणा विधानसभा मतदारसंघात बंडखोरी होणार का ? त्यातच गेल्या दोन दिवसा अगोदर देवेंद्र फडणीस हे चिखली येथे आले असता त्यावेळी विजयराज शिंदे यांनी त्यांची भेट घेतली होती व सभेमध्ये सुद्धा हे एकाच मंचावर बसले होते त्यामुळे विजयराज शिंदे यांनी देवेंद्र फडणीस यांची परवानगी घेऊनच या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केला का ? असा सुद्धा या ठिकाणी प्रश्न निर्माण होत आहे त्यातच आज विजयराज शिंदे यांनी मुंबई येथे देवेंद्र फडणीस यांच्या सागर बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली व चर्चा केली मात्र ही चर्चा बुलढाणा विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या घडामोडी बाबत झाली असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे आता विजयराज शिंदे हे आपला उमेदवारी अर्ज मागे घेतात का ? पक्षाच्या सांगण्यावरूनच या ठिकाणी उमेदवारी अर्ज ठेवणार आहे का ? असाही या ठिकाणी प्रश्न निर्माण होत आहे त्यामुळे विजयराज शिंदे यांच्या भेटीमागे दडलय काय असा सुद्धा या ठिकाणी प्रश्न निर्माण होत आहे विजयराज शिंदे म्हणतात बुलढाणा विधानसभा मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढतीसाठी मला परवानगी देण्यात यावी असेही त्यांनी गेल्या अनेक दिवसापासून पक्षाकडे मागणी केली आहे त्यासाठीच आता देवेंद्र फडणीस यांची भेट घेतली आहे का ? या भेटीमध्ये काय दडलय हे येणाऱ्या चार तारखेला समजणार आहे मात्र विजयराज शिंदे यांच्या भेटीमुळे खमंग चर्चा सध्या मतदारसंघात ऐकायला मिळत आहे