महाराष्ट्र मराठा सोयरीक चा उपक्रम..5 नोव्हेंबरला मराठा वधू-वर पालक बैठकीचे बुलढाणात आयोजन

44

(मोताळा लाईव्ह )दिवाळी झाल्यानंतर लग्न समारंभाला सुरुवात होते, हे हेरून मराठा समाजातील मुला मुलींच्या लग्नासाठी जुळवणी करता यावी म्हणून श्री मिसाळ यांच्या माऊली हाईट्स ,डॉक्टर राजेंद्र गोडे यांच्या निवासस्थानासमोर. व एम एस सी बी च्या बाजूला चिखली रोड बुलढाणा येथे पाच नोव्हेंबर मंगळवार रोजी सकाळी ठीक दहा वाजता महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन संकल्पक श्री सुनील जवंजाळ पाटील यांनी केले.विवाह जुळून येणे ही एक मोठी समस्या झाली आहे. सर्वच जाती समाज घटकातील तरुणांपुढे आज लग्न ही मोठी समस्या आहे. अशा वेळी ही सामाजिक समस्या हेरून महाराष्ट्र मराठा सोयरीक या लोक चळवळीचे संकल्पक श्री सुनील जवंजाळ पाटील यांनी राज्यभर प्रयत्न सुरू केले आहे. राजकारण विरहित कार्य त्यांनी गेल्या कितीतरी वर्षापासून सुरूच ठेवले आहे. समाज घटकातील सर्वच मुला-मुलींना योग्य स्थळ मिळावे यासाठी त्यांचा प्रयत्न नाविन्यपूर्ण ठरला आहे. बीड, रायगड, कोल्हापूर औरंगाबाद अहमदनगर लातूर सोलापूर अहमदनगर आदी जिल्ह्यामध्ये त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात सुद्धा ठिकठिकाणी त्यांनी मोठमोठे मेळावे व वधू-वरांना मार्गदर्शक कार्य सुरू केले. बुलढाणा येथे चिखली रोड येथील डॉक्टर गोडे यांच्या निवासस्थान समोर, माऊली हाईट्स बिल्डिंगमध्ये पाच नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता ही बैठक होत आहे. या बैठकीमध्ये विवाह इच्छुक मुला मुलींच्या पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. या बैठकीला मराठा सोयरीकचे मान्यवर मार्गदर्शन सुद्धा करणार आहेत.