कुणाच्या बापात किती दम, येत्या २३ तारखेला दिसेल-विजयराज शिंदे

25

(मोताळा लाईव्ह )बुलढाणा विधानसभा मतदारसंघात बंडखोरी करत भाजपा नेते विजयराज शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महायुतीमध्ये मतांचे विभाजन होऊ नये यासाठी पक्ष नेतृत्व प्रयत्न करत आहे की आपापल्या पक्षातील बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत. आज भाजपा नेते विजयराज शिंदे यांना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबईला बोलावलं आहे आणि बैठकीनंतर मी निर्णय जाहीर करेल असे देखील त्यांनी सांगितले. मी संजय गायकवाडला उमेदवारी मागितली नाही पक्षाला उमेदवारी मागितली आहे आणि पक्ष ठरवेल लढायचं की नाही लढायचं त्यांना हे बोलण्याचा अधिकारच नाही पक्षाने जर मैत्रीपूर्ण लढाईची परवानगी दिली तर त्याच्या बापात किती दम आहे 23 तारखे नंतर समजेल.