(मोताळा लाईव्ह )विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणेची सज्जता असून मतदारांनी निर्भयपणे आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हा निवडणुक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील व निवडणूक निरिक्षक सामान्य स्मिता सभरवाल, नरेश झा, सिमा सरकार व पोलीस निवडणूक निरिक्षक गुरमीतसिंग चौहान यांनी आज पत्रकार परिषदेत केले.जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघातील 2 हजार 288 मतदान केंद्रांवर 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून सुमारे 21 लाख 34 हजार 500 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्हा प्रशासनाचे लक्ष्य मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी असून यासाठी मतदारांनीही प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अधिकाधिक संख्येने मतदान करावे. तसेच भारत निवडणूक आयोगाने मतदारांच्या सुविधेसाठी विविध मोबाईल ॲप सुरु केलेल आहेत. इनकोअर, सुविधाॲप, सक्षम ॲप, केवायसी ॲप, सिव्हीजील, व्होटर टर्नआऊट ॲपचा समावेश आहे. वरील सर्व ॲप मतदारांच्या सुविधेसाठी असून पारदर्शक व भितीमुक्त निवडणूक पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. तसेच निवडणूक संदर्भातील तक्रारीसाठी निवडणूक निरिक्षक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी व निवडणूक निरिक्षक यांनी केले. यावेळी पोलीस अधिक्षक विश्व पानसरे, अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोणेवार आदी उपस्थित होते.जिल्ह्यात 21 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार : दि. 30 ऑक्टोंबर 2024 रोजीच्या अंतिम मतदार यादीनुसार जिल्ह्यातील मतदारांची संख्या 21 लक्ष 34 हजार 500 असून यामध्ये पुरुष मतदार 11 लक्ष 9 हजार 791, महिला मतदार 10 लक्ष 24 हजार 671 तर तृतीयपंथी मतदार 38 आहे. विधानसभा मतदार संघनिहाय मतदारांची संख्या याप्रमाणे : 21-मलकापूर विधानसभा मतदार संघात पुरुष मतदार 1 लक्ष 50 हजार 56, महिला मतदार 1 लक्ष 38 हजार 326 तर तृतीयपंथी 6 असे एकूण 2 लक्ष 88 हजार 385 मतदार आहेत. 22- बुलढाणा विधानसभा मतदार संघात पुरुष मतदार 1 लक्ष 59 हजार 452, महिला मतदार 1 लक्ष 47 हजार 638 तर तृतीयपंथी 16 असे एकूण 3 लक्ष 7 हजार 106 मतदार आहेत. 23- चिखली विधानसभा मतदार संघात पुरुष मतदार 1 लक्ष 57 हजार 170, महिला मतदार 1 लक्ष 48 हजार 546 तर तृतीयपंथी 2 असे एकूण 3 लक्ष 5 हजार 718 मतदार आहेत. 24-सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघात पुरुष मतदार 1 लक्ष 68 हजार 601, महिला मतदार 1 लक्ष 54 हजार 393 तर तृतीयपंथी 1 असे एकूण 3 लक्ष 22 हजार 995 मतदार आहेत. 25-मेहकर विधानसभा मतदार संघात पुरुष मतदार 1 लक्ष 59 हजार 378, महिला मतदार 1 लक्ष 46 हजार 578 तर तृतीयपंथी 4 असे एकूण 3 लक्ष 5 हजार 960 मतदार आहेत.26- खामगांव विधानसभा मतदार संघात पुरुष मतदार 1 लक्ष 55 हजार 632, महिला मतदार 1 लक्ष 42 हजार 285 तर तृतीयपंथी 5 असे एकूण 2 लक्ष 97 हजार 922 मतदार आहेत. तर 27-जळगाव जामोद विधानसभा मतदार संघात पुरुष मतदार 1 लक्ष 59 हजार 505, महिला मतदार 1 लक्ष 46 हजार 905 तर तृतीयपंथी 4 असे एकूण 3 लक्ष 6 हजार 414 मतदार आहेत.जिल्ह्यात 2 हजार 228 मतदान केंद्र : जिल्हयात लोकसभेसाठी 2265 मतदान केंद्र होती.यात 23 नविन मतदान केंद्रांची वाढ होऊन विधानसभा निवडणूक 2024 साठी जिल्ह्यामध्ये 2288 मतदान केंद्र आहे. यामध्ये मलकापूर येथे 305, बुलढाणा येथे 337, चिखली 317, सिंदखेड राजा 340, मेहकर 350, खामगांव 322 तर जळगाव जामोद येथे 317 असे एकूण 2 हजार 228 मतदान केंद्र आहे. एकूण मतदान केंद्राच्या 50 टक्के मतदान केंद्रावर वेब कॉस्टींग केल्या जाणार असल्याची माहिती यावेळी दिली.जिल्ह्यात 115 उमेदवारांमध्ये लढत तर 72 उमेदवारांची माघार : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील सातही मतदारसंघात नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी 72 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता 115 उमेदवारांमध्ये निवडणूकीची लढत होणार आहे. मलकापूर येथे 15, बुलढाणा येथे 13, चिखली येथे 24, सिंदखेड राजा येथे 17, मेहकर येथे 19, खामगांव येथे 18 व जळगांव जामोद येथे 9 असे एकूण 115 उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. तसेच नामनिर्दिष्ट उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले, ते याप्रमाणे : मलकापूर येथे 7, बुलढाणा येथे 8, चिखली येथे 18, सिंदखेड राजा येथे 18, मेहकर येथे 11, खामगांव येथे 4 व जळगांव जामोद येथे 6 असे एकूण 72 उमेदवारांचे नामनिर्देशन उमेदवारी मागे घेतले आहेत.