(मोताळा लाईव्ह )विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात “कोरडे दिवस” पाळण्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहे. त्यानुसार दि. 18 नोव्हेंबरचे सायंकाळी 5 वाजेपासुन ते 20 नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील सर्व मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद राहतील. तसेच दि. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणीच्या दिवशी कोरडा दिवस जाहीर करण्यात आलेला आहे. मध्यप्रदेश राज्याच्या सिमावर्ती भागात सुद्धा कोरडा दिवस जाहीर करण्याबाबत बुरहानपुरचे(मध्यप्रदेश) जिल्हाधिकारी यांना पत्र देण्यात आले आहे.
बुलढाणा जिल्ह्यात रात्री गस्त घालुन खाजगी वाहने, ट्रॅव्हल्स इत्यादी मधुन अवैध मद्य वाहतुक होऊ नये याकरिता कसुन तपासणी करण्यात येत आहे. सिमावर्ती जिल्ह्याच्या मार्गावर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून मध्यप्रदेश अबकारी विभागासोबत संयुक्त मोहिम राबविण्यात येत आहे. अवैध मद्य विक्रेते, वाहतुक व विक्री करणाऱ्यावर तसेच हॉटेल्स, ढाब्यांची तपासणी करुन ढाबा चालक, मालकांसह त्याठिकाणी मद्य सेवन करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. अनियमीतता आढळून येणाऱ्या परवानाधारक मद्यविक्री दुकानदारांवरही कारवाई सुरु आहे. नागरीकांनी अवैधरित्या मद्यविक्री करणाऱ्या हॉटेल्स ढाब्यावर जाऊन मद्य सेवन करु नये, असे आवाहन करण्यात येत आहे. अवैध मद्यविक्री करणाऱ्या हॉटेल्स, ढाब्याबाबत, अवैध मद्यनिर्मीती वाहतुकीबाबत माहीती देण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडील टोल फ्री नंबर १८००२३३९९९९ किंवा व्हॉटसअॅप नंबर ८४२२००११३३ वर किंवा excisesuvidha.mahaonline.gov.in या विभागाचे पोर्टलवर तात्काळ माहिती द्यावी.