(मोताळा लाईव्ह ) शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मेहकर मतदारसंघांमध्ये तीन पंचवार्षिक आमदार राहिलेले महायुतीचे उमेदवार डॉक्टर संजय रायमुलकर यांचा महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा नवखा उमेदवार सिद्धार्थ खरात यांनी पराभव केला आहे.. मेहकर विधानसभा मतदारसंघ हा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा होमटाऊन आहे.. तर या ठिकाणी संजय रायमुलकर हे तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहे.. मात्र यावेळेस मंत्रालयीन कामकाजाचा तीस वर्षाचा अनुभव असलेले सिद्धार्थ खरात यांनी रायमुलकरांचा पराभव केला आहे.. डॉ संजय रायमुलकर यांना मतदारांनी 99423 मते मिळाली तर सिद्धार्थ खरात यांना 104242 मतदारांनी पसंती दिली आहे.. त्यामुळेच सिद्धार्थ खरात यांचा 4819 मतांनी दणदणीत विजय झाला आहे.. ही निवडणूक जनतेने हाती घेतलेली होती त्यामुळेच माझा विजय झाला.. उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद आणि माजी आमदाराबाबत असलेला असंतोष उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीने दिलेल्या उमेदवाराचे जनतेने उत्स्फूर्त स्वागत केलं आहे अशी प्रतिक्रिया मेहकर विधानसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार आमदार सिद्धार्थ खरात यांनी दिली आहे..