(मोताळा लाईव्ह ) आज जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग बांधवांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली आहेत. आंध्रप्रदेश मध्ये ज्याप्रमाणे तेथील मुख्यमंत्र्यांनी दिव्यांग बांधवांना सहा हजार रुपये लागू केले आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने देखील सहा हजार रुपये लागू करावे, जिल्हा दिव्यांगाची टक्केवारी न लावता सरसकट किमान 40% दिव्यांग असलेल्या व्यक्तींना संबंधित संस्थांच्या स्व उत्पन्नातून पाच टक्के निधी वाटप करण्याचे सक्त निर्देश देण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी दिव्यांग बांधवांनी निदर्शने करत आपल्या मागण्या तात्काळ मान्य कराव्या अशी विनंती केली आहे.